
नागपूर ः राजसिंग डुंगरपूर ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. साखळी सामन्यात मध्य प्रदेश संघावर पहिल्या डावाच्या आघाडीवर विदर्भ संघाने आगेकूच केली आहे.
विदर्भ संघाच्या ३२७ धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाने दीर्घ आणि कठोर संघर्ष केला. परंतु विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांना ९६.१ षटकांत २८७ धावांत गुंडाळले. दोन दिवसांचा सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या डावात आघाडी घेतल्याबद्दल विदर्भाने ३ गुण मिळवले, तर मध्य प्रदेशला १ गुण मिळाला.
साखळी फेरीच्या शेवटी विदर्भ आणि मध्य प्रदेश दोघांनीही प्रत्येकी १० गुणांसह समाप्त केले परंतु विदर्भाने हेड-टू-हेड काउंटच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला.
३-५ मे रोजी होणाऱ्या ३ दिवसांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या विदर्भाचा सामना टेबल टॉपवर असलेल्या उत्तर प्रदेश (२० गुण) विरुद्ध होईल.
त्याआधी, प्रिन्स कुमारने एकट्याने विदर्भाच्या आक्रमणाला एका शानदार डावात झुंजवले. तो तीन बाद ४६ अशी परिस्थिती असताना फलंदाजीला आला आणि २२१ चेंडूंचा सामना करत २६ चौकार आणि दोन षटकार मारत नाबाद राहिला. दुसऱ्या टोकाला त्याला साथ मिळाली नाही.
विदर्भ संघाकडून स्पर्श धनवाजीर (३-३१), रौनक हेदाऊ (२-३०), मानव वाकोडे (२-५१) आणि हिरेन त्रिवेदी २-४५) यांनी विकेट वाटून घेतल्या. प्रिन्सला सामनावीर घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ अंडर १४ मुले – पहिला डाव ७४.३ षटकांत सर्वबाद ३२७ (अर्जुन महाजन ८४, मल्हार धुरड ५७, मानव वाकोडे ४०, समर्थ नाथानी ३८, अथर्व पटेल नाबाद ४५, प्रिन्स कुमार ४/६९).
मध्य प्रदेश अंडर १४ मुले – पहिला डाव ९६.३ षटकात सर्वबाद २८७ (वीर पांडे ३६, प्रिन्स कुमार नाबाद १५४, स्पर्श धनवजीर ३-३१, रौनक हेडाऊ २-३०, मानव वाकोडे २-५१, हिरेन त्रिवेदी २-४५).