राष्ट्रीय सब ज्युनियर वुशू स्पर्धेसाठी शेख जोहानची निवड

  • By admin
  • May 3, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय ओपन सब जुनियर वुशू स्पर्धेत शेख जोहान याने सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे शेख जोहान याची २६ ते ३१ मे या कालावधीत तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शेख जोहान हा अल हिदाया पब्लिक शाळेच्या विद्यार्थी आहे आणि तो तिसरी वर्गात शिक्षण घेत आहे

रिया इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव (पुणे) येथे राज्यस्तरीय सब ज्युनिअर वुशू ओपन ट्रायल सिलेक्शन घेण्यात आल्या. या स्पर्धेत शेख जोहान याने आपला दबदबा कायम ठेवून ३० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. जोहानच्या या शानदार कामगिरीबद्दल राज्याचे वुशू संघटनेचे सचिव सोपान कटके व जिल्हा वुशू संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, सचिव महेश इंदापुरे व झेड एस वॉरियर अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद जहूर अली व अल फराद वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सय्यद वाजेद अली व कोच सद्दाम मुसा सैय्यद, शेख रिजवान, बंटी राठोड, सुमित खरात यांनी अभिनंदन केले व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *