
डॉ जॉन के व्ही यांना छत्रपती शिवाजी महाराज कराटे भूषण पुरस्कार प्रदान
नागपूर (सतीश भालेराव) ः नागपूर येथे शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडिया आणि अम्युॅचर ट्रेडिशनल कराटे असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या महाराष्ट्र राज्य निमंत्रित कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १० जिल्ह्यातील ७२२ खेळाडू सहभागी झाले होते. या प्रसंगी डॉ जॉन के व्ही यांना छत्रपती शिवाजी महाराज कराटे भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान नागपूर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्याच्या १० जिल्ह्यातील ७२२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. मुलां-मुलींच्या सब ज्युनियर, कॅडेट व ज्युनियर या वयोगटात आयोजित कुमिते या क्रीडा प्रकारात खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करीत स्पर्धेला रंगत आणली. स्पर्धेचे उद्घाटन नागपूरच्या शाही घराण्याचे वंशज राजे जयसिंह मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपतींच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. दिल्ली पब्लिक स्कूल मिहान नागपूर मुख्याध्यापिका निधी यादव, मोंटफोर्ट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ जॉन के व्ही, एसकेआय इंडियाचे अध्यक्ष सुरेंद्र उगले या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भूषण पुरस्कार समिती व शोतोकान कराटे इंटरनॅशनल ऑफ इंडिया द्वारे कराटे खेळाच्या विकासाकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्थेला देण्यात येणारा सन २०२४-२५ चा प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज कराटे भूषण पुरस्कार मोंटफॉर्ट एजुकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ जॉन के व्ही यांना त्यांच्या कराटे क्षेत्रातिल भरीव कार्याकरिता देण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर संस्थानचे श्रीमंत राजे जयसिंह मुधोजीराजे भोसले यांचे हस्ते प्रदान करन्यात आला. प्रशस्तीपत्र, छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती, मानचिन्ह पुरस्कार स्वरूप भेट देण्यात आले.
स्पर्धेतील सर्वाधिक पदक विजेत्या नागपूर शहर व नागपूर जिल्हा या संघाना अनुक्रमे सर्वसाधारण विजेतेपदाचा व उपविजेते पदाचा मानाचा छत्रपति शिवाजी महाराज चषक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरेंद्र उगले यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आयोजित या नियोजनबद्ध स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता सचिव योगेश चव्हान, मिलिंद कुमार गेडाम, युगांत उगले, भारत ठाकरे, सादिक अहमद, सतीश मस्के, अभिलाष भुसारी, आशिष चाफेकर, रमेश धापाडे, किरण बोरकर, कृष्णा भलावि, वैभव डाखोले, रेखा खरे, कमलेश ठाकूर, अक्षय भिंगारे, प्रा प्रज्ञासूर्य रामटेके यांनी विशेष परिश्रम घेतले.