
सोलापूर ः सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १२ मे पासून जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर १९ वर्षांखालील किरण पवार चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
डॅनीश केकने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा ४० षटकाची आहे. या स्पर्धेत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशतर्फे लेदर बॉल मोफत पुरवण्यात येईल. इच्छुक संघानी ८ मेपर्यंत प्रवेश फी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ऑफिसमध्ये येऊन जमा करणे बंधनकारक आहे. ज्या संघाची प्रवेश फी जमा होईल, त्या संघाचा स्पर्धेसाठी विचार केला जाईल. १० मे रोजी १२ वाजता सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये स्पर्धेचे लॉट्स टाकण्यात येईल. एक सप्टेंबर २००७च्या पुढील जन्मलेले खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी शिवा अकलूजकर (9881786578) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.