बुद्धिबळ स्पर्धेत भूमिका वाघलेला विजेतेपद 

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भूमिका वाघले हिने विजेतेपद पटकावले. 

गरवारे कम्युनिटी सेंटर येथे खुली बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतून चार अव्वल खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बुलढाणा येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. 

खुल्या गटातील अजिंक्यपद भूमिका वाघले हिने मिळवले. अंतिम फेरीत अतिशय अटीतटीच्या लढतीत सारंग कुलकर्णी हा उपविजेता ठरला तर निशित बलदवा यास तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या निवड चाचणी स्पर्धेत लहान गटांतील स्पर्धकांनी पण खुल्या गटातील खेळाडूंना कडवी झुंज दिली. 

पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी विजयी संघाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच कनिष्ठ गटातील उत्तम कामगिरी करणाऱ्या यशस्वी खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल, रमाकांत रौत्तल्ले, तसेच मुख्य पंच विलास राजपूत, अमरीश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

अंतिम निकाल 

खुला गट ः १. भूमिका वाघले, २. सारंग कुलकर्णी, ३. निशित बलदवा, ४. सौविक चक्रवर्ती. 

महिला गट ः डॉ जिनल वकील. 

अन्य गटातील यशस्वी खेळाडू ः आदित्य जोशी, राघव जोशी , प्रियल शिखरे, श्रेया शेळके, तनिष कुमार, आयुष गायकवाड, नित्या ललवाणी, आनंदी अरोरा, देवांश तोतला, अर्चित बागला, निहरिका अरोरा, अनुष्का हातोळे, सम्राट शिंदे, शौनक खंगार, मनवा क्षीरसागर, आराधिता जाधव, चैतन्य कबाडे, अर्णव तोतला, अक्षरा शहा, तनुजा कातुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *