
नाशिक ः राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये मुला आणि मुलींच्या गटात नाशिक ग्रामीण संघाने तृतीय पारितोषिक संपादन केले.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी म्हसरूळ येथील एमएमसी क्रीडांगणावर उत्साह संपन्न झाली. या स्पर्धेत नाशिक संघाने मुले व मुलीच्या गटात तृतीय पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र महिला अध्यक्षा धनश्री गिरी तसेच मुंबई उपनगर जिल्हा सचिव संदीप पाटील, सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड आणि पंच मंडळ उपस्थित होते.
या स्पर्धेत पुरुष विभागात एकूण ११ संघ सहभागी झाले होते, तर महिला गटात ४ संघ सहभागी झाले. राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये नाशिक ग्रामीण संघाकडून कर्णधार विजय घोटेकर, राजेंद्र सांगळे, भगवान वाकचौरे, प्रशांत गुंजाळ, पवन पोटिंदे, तुषार काताळे, रवीराज यादव, विकास पाटील यांनी शानदार कामगिरी बजावली.
नाशिक ग्रामीण मुलींच्या संघात कर्णधार रागिनी आहेर, आराध्या सालमुठे, श्रद्धा मोगल, वेदिका कुशारे, अनुष्का कुशारे, मोक्षदा जाधव, करुणा शिंदे, अनुष्का गांगुर्डे यांनी चमकदार कामगिरी बजावली.
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, उपाध्यक्ष विलास गिरी, महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.