
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा – स्वप्नील हंचाटे सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन अ गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ग्रुप अ संघाने कलबुर्गीच्या केसीसी संघावर ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या साऊथ सोलापूर संघाने सर्वबाद १६८ धावा केल्या. विजयी १७९ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या कलबुर्गीचा डाव साऊथ सोलापूर संघाने ९२ धावांत रोखला. तीन बळी टिपणारा स्वप्नील हंचाटे सामनावीर ठरला. हा पुरस्कार त्यास पंच मंजुनाथ बिराजदार व नितीन गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
साऊथ सोलापूर आपटे ग्रुप (अ) : ३५ षटकांत सर्वबाद १६८ (आमिर खान ३५, श्रेयस दुधगी, निरंजन कदम व ओंकार भांबुरे प्रत्येकी १९ धावा, अजय राठोड ३ बळी, अभिषेक उळ्ळी, रोहित राठोड व ओंकार मडीवाळ प्रत्येकी २ बळी, प्रशांत होसमणी १ बळी) विजयी विरुद्ध केसीसी कलबुर्गी : २७.४ षटकांत सर्वबाद ९२ (ओंकार मडीवाळ २१, प्रशांत होसमाणी १५, प्रदीप नाबाद १४, स्वप्नील हंचाटे ३ बळी, रोहित जोशी व अतुल चौधरी प्रत्येकी २ बळी, ओंकार भांबुरे व निरंजन कदम प्रत्येकी १ बळी).