
चिखली : पाटणा (बिहार) येथे ११ ते १५ मे या कालावधीत सातव्या युथ गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र तलवारबाजी संघात चिखली (बुलढाणा) येथील खेळाडू पियुष कोल्हे याची निवड करण्यात आली आहे.
भारत सरकारने पाटणा (बिहार) येथे आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचा खेळाडू याने रुद्रपूर (उत्तराखंड) येथे झालेल्या १९व्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पदक प्राप्त केले. याच कामगिरीमुळे त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केले आहेत. त्याचे सराव शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. त्याला अक्षय गोलांडे, शुभम सुरडकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राजेजाधव, सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे, युवराज भुसारी, मयूर बाहेकर, नितीन जेऊघाले, बाळकृष्ण जाधव, गजेंद्र देशमुख, श्रीराम निळे, माधव मंडळकर यांनी अभिनंदन केले आहे.