
मुंबई : वरळी येथील एनएससीआय क्लबमध्ये सुरू असलेल्या चौथ्या एनएससीआय बॉल्क लाइन स्नूकर स्पर्धेच्या मुख्य फेरीतील सी गटात रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये साद सय्यद, अनंत मेहता आणि अनुराग बागरी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दमदार आगेकूच केली.
साद सय्यदने युधिष्ठिर जयसिंगवर ४-१ अशी सहज मात करत आपली चतुरस्र खेळी सादर केली. कृष्णा तोहगावकरने फैसल खानविरुद्ध रंगतदार लढतीत ४-२ असा विजय मिळवला. सुरुवातीला पिछाडीवर असतानाही अनंत मेहताने सागर मेहतावर ४-१ ने विजय मिळवला.
अनुराग बागरीचे जबरदस्त पुनरागमन
सुरूवातीला ०-२ ने मागे असलेला अनुराग बागरी याने जबरदस्त पुनरागमन करत महेश जगदाळेचा ४-२ असा पराभव केला.