
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा – शिवप्रसाद रावळे सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूरच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत मॉडेल क्रिकेट अकॅडमीने बीटीसीए बार्शीवर ८ गडी राखून मात केली.
येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बार्शीच्या डाव मॉडेल अकादमीने ६६ धावांत गुंडाळला. विजयी ६७ धावांचे सोपे लक्ष्य मॉडेलने २ गडी गमावत गाठले. चार बळी टिपणारा शिवप्रसाद रावळे सामन्याचा मानकरी ठरला. त्यास इन्स्टिट्यूटचे खजिनदार विक्रांत पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून दयानंद नवले व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यानी काम पाहिले.
संक्षिप्त धावफलक
बीटीसीए बार्शी : १५ षटकांत सर्वबाद ६६ (मयूर लाकल नाबाद १४, समर्थ
देशमुख १३, शिवप्रसाद रावळे ४ बळी, सुधान्व मनुर ३ बळी, सुदेश राठोड २ बळी) पराभूत विरुद्ध मॉडेल क्रिकेट अकॅडमी ब संघ : ८.१ षटकांत २ बाद ६७ (अक्षय हावळे ३३, संदीप राठोड नाबाद २६, भगवंत आदलींगे १ बळी).