दक्षिण विभागाचा कोल्हापूरवर रोमांचक विजय 

  • By admin
  • May 6, 2025
  • 0
  • 136 Views
Spread the love

अर्णव ससाने, पृथ्वीराज कणसेची लक्षवेधक कामगिरी 

पनवेल ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ लीग क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभाग संघाने कोल्हापूर संघावर ३९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अर्णव ससाने (६-२९), पृथ्वीराज कणसे (६२) यांची कामगिरी प्रभावी ठरली.

या सामन्यात दक्षिण विभाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत पहिल्या डावात २०.२ षटकात सर्वबाद ४७ धावा काढल्या. त्यानंतर कोल्हापूर संघ पहिल्या डावात २९.१ षटकात ७१ धावांत गडगडला. दक्षिण विभागाने दुसऱया डावात ५५ षटकात सर्वबाद १३२ धावा काढल्या. कोल्हापूर संघ दुसऱया डावात ३२.१ षटकात ६९ धावांत सर्वबाद झाला आणि दक्षिण विभागाने कमी धावसंख्येचा रोमहर्षक सामना ३९ धावांनी जिंकला. 

कमी धावसंख्येच्या या रोमहर्षक सामन्यात पृथ्वीराज कणसे याने १११ चेंडूत ६२ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने ११ चौकार मारले. विरेन पाटील याने २४ धावांचे योगदान दिले. शंभुराज याने तीन चौकारांसह २३ धावा फटकावल्या. गोलंदाजीत अर्णव ससाने याने प्रभावी गोलंदाजी करत अवघ्या २९ धावांत सहा विकेट घेऊन सामना गाजवला. अथर्व ओतारी याने २१ धावांत पाच गडी बाद करुन आपली चमक दाखवली. पार्थ सायमोते याने १५ धावांत तीन बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण विभाग ः पहिला डाव ः २०.२ षटकात सर्वबाद ४७ (आदिराज रणसिंग ७, पार्थ सायमोते ९, जीवन वराडे १३, संभाजी शिंदे नाबाद ९, अथर्व ओतारी ५-२१, समरवीर भोसले ३-९, अद्वैत नार्वेकर २-१२).

कोल्हापूर ः पहिला डाव ः २९.१ षटकात सर्वबाद ७१ (अर्जुन घोरपडे ८, वीरेन पाटील २४, शिवजीत इंदुलकर १६, अथर्व ओतारी ७, पार्थ पाटील ३-१२, पार्थ सायमोते २-१७, अर्णव ससाने २-१७, अर्णव मालू २-१, सुमित घालके १-१७).

दक्षिण विभाग ः दुसरा डाव ः ५५ षटकात सर्वबाद १३२ (शंभुराज २३, जीवन वराडे ८, संभाजी शिंदे १०, पृथ्वीराज कणसे ६२, पार्थ पाटील ६, अर्णव ससाने नाबाद ७, समरवीर भोसले ३-३५, संस्कार पाटील ३-२०, अद्वैत नार्वेकर १-७, सौरभ सैनी १-९, यश पाटील १-१३).

कोल्हापूर ः दुसरा डाव ः ३२.१ षटकात सर्वबाद ६९ (यश पाटील २२, वीरेन पाटील ८, समरवीर भोसले ७, अर्णव ससाने ६-२९, पार्थ सायमोते ३-१५, अर्णव मालू १-८). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *