एमसीए अंडर १९ लीग स्पर्धेत कॅडेन्स संघाला विजेतेपद  

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए अंडर १९ लीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स संघाने पहिल्या डावाच्या आघाडीवर विजेतेपद पटकावले. कॅडेन्स आणि आर्यन्स यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.

पुण्यातील शिंदे हायस्कूल मैदानावर कॅडेन्स व आर्यन्स यांच्यात विजेतेपदासाठी सामना झाला. या सामन्यात आर्यन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या डावात १११ षटके फलंदाजी करत सर्वबाद ३७९ धावसंख्या उभारली. त्यानंतर कॅडेन्स संघाने चोख प्रत्युत्तर देत  १४७.५ षटके फलंदाजी करुन सर्वबाद ४९४ धावांचा  डोंगर उभारुन सामन्यात ११५ धावांची आघाडी घेतली. हीच आघाडी कॅडेन्स संघाला विजेतेपद मिळवून देणारी ठरली.
दुसऱया डावात आर्यन्स संघाने १२.२ षटकात एक बाद ५४ धावा काढल्या होत्या.

धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात मोहित कटारिया याने २८० चेंडूंचा सामना करत १३१ धावांची दमदार खेळी केली. शतकी खेळीत त्याने १९ चौकार व १ षटकार मारला. मोहम्मद अरकाम याने १९९ चेंडूंचा सामना करत १०९ धावा फटकावल्या. त्याने १६ चौकार व २ षटकार मारले. एकनाथ देवडे याने १४७ चेंडूत ९२ धावांची दमदार खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. त्याने आपल्या शानदार खेळीत १५ चौकार मारले. 

गोलंदाजीत मोहम्मद अरकाम याने ७४ धावांत पाच विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. आदित्य दाडे याने ७५ धावांत चार गडी बाद केले. आधार सावंत याने ८७ धावांत तीन बळी टिपले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स परिषदेचे सदस्य रणजीत खिरीड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.  

संक्षिप्त धावफलक 

आर्यन्स टीम ः पहिला डाव ः १११ षटकात सर्वबाद ३७९ (एकनाथ देवडे ९२, रित्विक राडे ४५, सार्थक ढमढेरे ५३, सुशिक जगताप ६३, विजेंद्र सिंग ९, आदर्श रावल ५९, स्वराज अदाने ३९, मोहम्मद अरकाम ५-७४, इशान लोया २-७१, ओमकार भागवत २-८६, शौर्य पारखे १-९७). 

कॅडेन्स टीम ः पहिला डाव ः १४७.५ षटकात सर्वबाद ४९४ (मोहित कटारिया १३१, धीरज ढेरे १४, मोहम्मद अरकाम १०९, इशान लोया ७९, ओमकार भागवत ३०, शौर्य पारखे ५४, अद्वैत गायकवाड २२, इतर ३६, आदित्य दाडे ४-७५, आधार सावंत ३-८७). 

आर्यन्स टीम ः दुसरा डाव ः १२.२ षटकात एक बाद ५४ (एकनाथ देवडे नाबाद १३, आदर्श रावल ४०, मोहम्मद अरकाम १-१५). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *