जलतरण शिकण्याचे योग्य व सुरक्षित ठिकाण म्हणजे जलतरण तलाव – राजेश भोसले

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

लतरण शिकण्यासाठी अनोळखी जलाशयामध्ये पोहणे किंवा पोहायला जाणे, पोहायला शिकणे हे आपल्या जीवावर बेतू शकते. हे माहीत असूनही अनेक जण आपल्या आसपास असणाऱ्या आड, विहीर, बारव, नदी, नाला, कालवा, चारी, बंधारा, तळे, शेततळे, तलाव, सरोवर, सिंचन प्रकल्पांवर पोहायला शिकण्यासाठी जाण्याचे जीवघेणे धाडस करताना दिसतात व आपला अनमोल जीव गमावतात. उन्हाळी सुट्टी-दिवाळी सुट्टी व इतर सुट्ट्यांमध्ये असे अपघात जास्त प्रमाणात झाल्याचे दिसते.

दरवर्षी जगभरात जवळपास अडीच ते तीन लाख लोक पोहता न आल्यामुळे विविध जलस्त्रोतांमध्ये बुडून मृत्यूमुखी पडतात व त्या मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेने म्हटले आहे. आपण ज्या प्रमाणे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी योग्य अशा शैक्षणिक संस्था-इन्स्टिट्यूटचा शोध घेतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. असेल ती फी भरण्याची आपली तयारी दर्शवतो. सर्व ते आपण करतो. पण जलतरणासारखे जीवन उपयोगी-जीवनावश्यक कौशल्य शिकताना आपण पाहिजे त्या प्रमाणात गांभीर्यपूर्वक विचार करताना दिसत नाही. तर खुल्या जलाशयाचा वापर करताना दिसतात. बहुधा जलतरण तलावाची फीस व प्रशिक्षणाच्या खर्चाचा विचार करताना पालक दिसतात. अजून सुद्धा जलतरणसारख्या महत्वपूर्ण कौशल्य शिकण्यासाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता आपल्या समाजामध्ये दिसून येत नाही हे मोठे दुर्देव आहे.

जर आपल्या पाल्याला, मुलांना पोहणे शिकण्याची इच्छा किंवा आवड असेल तर ती या उन्हाळी सुट्टीत पूर्ण करा. आपल्या जवळपास असलेल्या जलतरण तलावाचा शोध घ्या. प्रवेश घेण्यापूर्वी त्या ठिकाणा वर मुलांना घेऊन जा. त्यांच्याशी बोला. त्यांची उत्सुकता जाणून घ्या. त्यांना प्रोत्साहित करा. पाल्याला खुल्या जलाशय व जलतरण तलावातील फरक समजावून सांगा व रितसर प्रवेश घेऊन जलतरणाचे प्राथमिक धडे जलतरण तलावावरच घ्यावे असे आवाहन जागतिक जलतरण साक्षरतेचे जनक राजेश भोसले यांनी केले आहे. 
जलतरणापूर्वी समुपदेशनासाठी 95279 24646 या क्रमांकावर संपर्क साधल्यास बरीच सकारात्मक माहिती आपणास मिळू शकते असे ही त्यांनी म्हटले आहे. कारण खुल्या जलस्त्रोतांची नैसर्गिक रचना आपल्याला माहित नसते. पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज आपल्याला येत नाही. जलस्त्रोताची लांबी-रुंदी-खोलीचा अंदाज न आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. खुल्या जलस्त्रोतांचा विस्तार अधिक असल्यामुळे त्यातील अडथळे ही निश्चितच मोठे असतात. अनोळखी पाण्याच्या ताकदीचा अंदाज आपल्याला येत नाही. कोणत्याही प्रकारची आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर उपाययोजना उपलब्ध नसते. पण तुलनेत जलतरण तलाव हा बंदिस्त असतो. पाणी स्वच्छ व निर्जंतुक असते. तलावाचे चारही कोपरे स्पष्ट दिसतात. म्हणून भीती हा प्रकार कमी होण्यास मदत होते. ठीकठिकाणी माहिती फलक लावलेले असतात. महत्वपूर्ण सूचना लिखित स्वरुपात असतात.उथळ पाणी, खोल पाणी इत्यादी दिशादर्शक यांनी दाखविले जाते. तोडीं सूचना देखील दिल्या जातात. तसेच बऱ्याच ठिकाणी सूचना देण्यासाठी माईक सिस्टीमचा वापर केला जातो.


विशेष म्हणजे जलतरण तलावावर जलतरण शिकविण्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षक असतात. त्यांना मदतीला जीवरक्षक-आवश्यक साधन साहित्यांसह तैनात असतात. चुकून काही अप्रिय घटना घडल्यास प्रथमोपचार सुविधा उपलब्ध असते. तसेच
जलतरण तलाव हा शहरी भागात असल्याकारणाने लवकर दवाखाण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. असे एक नव्हे तर अनेक फायदे-सोयी-सुविधा या जलतरण तलावावर उपलब्ध असल्यामुळे आपण त्याचा लाभ घ्यावा व जलतरण शिक्षणाचे प्राथमिक धडे हे जलतरण तलावावर गिरवावे यासाठी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे जलतरण दूत मुकेश बाशा, विजय खंडागळे, अंजूषा मगर, पौर्णिमा भोसले, वंदना वाघमोडे, विजय भोसले, पियुष देशमुख, जीत भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *