
राजवीर : हरियाणा संघाने कबड्डीतील हुकुमत कायम राखत सातव्या खेलो इंडिया यूथ क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला नमवत सुवर्णपदक पटकावले. ३९-२८ गुणांनी हरियाणाने बाजी मारली.

राजवीर क्रीडा संकुलात विजयाचा चौकार झळकावत महाराष्ट्राने अंतिम फेरीत मजल मारली होती. अपेक्षेप्रमाणे अंतिम मुकाबला बलाढ्य हरियाणा विरूद्ध महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंनी चिवट झुंज दिली. पहिल्या फेरीत २२ -१७ गुणांनी महाराष्ट्राने आक्रमण करीत आपले आव्हान कायम राखले होते. उत्तरार्धात हरियाणाच्या यशस्वी चढाय्या आणि बचावात अपयश आल्याने महाराष्ट्राची पिछेहाट होत राहिली. लोणमुळे पिछाडी वाढत गेल्याने मनोबल खचलेल्या महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गतवेळी कांस्य पदक संपादन केले होते.