
मलकापूरच्या पाच खेळाडूंची निवड

मलकापूर : प्रायमरी स्कूल महाराष्ट्र लीग स्पर्धा २०२५ आयोजित संजीवणी हायस्कूल पांचगणी जिल्हा सातारा येथे १५ ते १७ मे दरम्यान होणाऱ्या अंडर १२ लिटिल चॅम्प स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील सॉफ्ट टेनिस असोसिएशन व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या तब्बल पाच खेळाडूंची निवड राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय पळसकर यांनी संघाची घोषणा केली आहे.

गतवर्षी पुणे येथे झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. या वर्षी या स्पर्धेत सॉफ्ट टेनिस या खेळाचा समावेश केला असून बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. त्यात पल्लव पाटील, हर्षल तिवणे, आरव दरेगावे, वरद जगताप, शशांक झनके या खेळाडूंचा समावेश आहे.


हे सर्व खेळाडू मलकापूर तालुका क्रीडा संकुल येथे प्रशिक्षण घेत असून या खेळाडूंना अभिषेक मानकर यांचे प्रशिक्षण व विजय पळसकर यांचे मार्गदर्शन लाभत आहेत. लिटिल चॅम्प खेळाडूंची जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष व आमदार चैनसुख संचेती, सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरगावकर, कार्याध्यक्ष राजेश महाजन तसेच सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे सचिव विजय पळसकर, राजेश्वर खगार तसेच लक्ष्मीशंकर यादव, नितीन भुजबळ आदींनी सर्व खेळाडूंना राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.