
मुंबई ः नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या ज्युबिली हॉलमध्ये ५९ व्या सिनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने नव्याने तयार केलेल्या एमसीए नाण्याने उद्घाटनाचा कौल देऊन व एक डाव खेळून प्रमुख पाहुणे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पर्धेचे उदघाटन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय एस पाटील, मानद सचिव विजय आर पाटील, राज्य कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन व राज्य कॅरम संघटनेच्यावतीने सन २०२२-२३ व २०२३-२४ सालाकारिता राज्य शासनाने गौरविलेल्या विश्व विजेत्या संदीप दिवे, नीलम घोडके, अभिजित त्रिपनकर, योगेश धोंगडे, आकांक्षा कदम तसेच माजी विश्व विजेते योगेश परदेशी व प्रशांत मोरे यांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे मानद सचिव विजय आर पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सांघिक गटातील साखळी सामन्यांचे निकाल
मुंबई उपनगर विजयी विरुद्ध नाशिक २-१ (सज्जाद शेख (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध हसन शेख (नाशिक) २५-१०, ९-११, २०-३, सर्फराज सय्यद (नाशिक) विजयी विरुद्ध मुनेश राजा (मुंबई उपनगर) २५-६, २३-५, महम्मद वाजिद अन्सारी व शाहबाझ शेख (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध फिरोझ शेख व महराज शेख (नाशिक) २०-२५, २२-१२, २५-४.
ठाणे विजयी विरुद्ध सांगली ३-० (झैदी अहमद (ठाणे) विजयी विरुद्ध रवींद्र कांबळे (सांगली) २५-०, २५-५, पंकज पवार (ठाणे) विजयी विरुद्ध किरण लोंढे (सांगली) २५-४, २५-५, महंम्मद अन्सारी व समीर अन्सारी (ठाणे) विजयी विरुद्ध रीतिकेश तिरमरे व फैझुल मोमीन (सांगली) २५-१, २५-५.
मुंबई विजयी विरुद्ध पालघर ३-० (प्रशांत मोरे (मुंबई) विजयी विरुद्ध सचिन पवार (पालघर) २५-१, २५-०, महम्मद घुफ्रान (मुंबई) विजयी विरुद्ध जोनाथन बोनल (पालघर) २५-९, २०-१५, राहुल सोळंकी व वाडवलकर (मुंबई) आशुतोष गिरी व बिपीन पांडेय सिद्धांत (पालघर) २४-११, २५-२१.
पुणे विजयी विरुद्ध कोल्हापूर ३-० (अभिजित त्रिपनकर (मुंबई) विजयी विरुद्ध ओंकारवड वडार (कोल्हापूर) २५-४, २५-२, सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध रोहित चौगुले (कोल्हापूर) १४-१३, २५-४, अनिल मुंढे व रहीम खान (पुणे) विजयी विरुद्ध अख्तर शेख व मंझूर शेख (कोल्हापूर) २५-१, २५-०.