
मुंबई : पेडर रोडवरील रशियन हाऊसमध्ये सुरू झालेल्या ऑल इंडिया चेस मास्टर्स एफआयडीई रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत टॉप १० सीडेड खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.
दकाश जागेसिया, यश कापडी, कुश अग्रवाल, दर्श शेट्टी, ओम गडा, जान्हवी सोनेजी, अभिषेक पाटील, सिद्धार्थ कुमार, स्वामीनाथन वागेश आणि मयुरेश पारकर यांनी आपापले सामने जिंकून विजयासह स्पर्धेची सुरुवात केली.
टॉप बोर्डवर दकाश जागेसियाने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना मायान झाकावर मात केली. दुसऱ्या बोर्डवर यश कापडीने पांढऱ्या मोहऱ्यांबरोबर संदीप अर्थला पराभूत केले. स्पर्धेचे उद्घाटन रशियन कल्चरल हाऊसचे मानद संचालक व्हिक्टर गोरेलिख यांच्या हस्ते झाले.