
जैन स्पोर्ट्स अकादमीच्या समर कॅम्पचा समारोप; विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
जळगाव ः ‘आपण खेळ खेळतो मात्र त्यात बक्षिस मिळेलच असे नाही. परंतु, आनंद नक्कीच मिळेल, खेळभावना विकसीत होईल, आपल्या ध्येयाकडे करिअर म्हणून बघण्याचा संस्कार आपल्यावर संस्कारित होईल; त्यासाठी खेळ हा छंद म्हणून जोपासला जावा. आवडीने खेळले तर त्यात करिअर करता येते. असे मनात पक्के ठरवले पाहिजे तसे झाले तर मार्गही सापडतो, खेळाव्यतिरिक्त काय आवडते याचाही विचार आपण केला पाहिजे, असा सल्ला देत देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा देवसिंग पाटील यांची बॅडमिंटनपटू ते राष्ट्रपती असा प्रेरणादायी प्रवास खेळाडूंसमोर केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत दादा अमळकर यांनी उलगडून दाखवला.
जैन स्पोर्ट्स ॲकडमीचा समर कॅम्प २०२५ चा समारोपाच्या पारितोषिक वितरण समारंभा वेळी प्रमुख अतिथी म्हणून भरत दादा अमळकर बोलत होते. कांताई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्ट्स ॲकडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.
जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने १५ एप्रिल ते ११ मे या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन केले होते. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बास्केटबॉल, तायक्वांदो, फुटबाॅल, कॅरम या क्रीडा प्रकारांमध्ये ५८० खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल सेकंडरी, कांताई सभागृह याठिकाणी समर कॅम्पचे आयोजन केले होते.
जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे नंदलाल गादिया यांनी मनोगत व्यक्त करून उन्हाळी प्रशिक्षण शिबीरात सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. माती ओली असेल तर तिला आकार देता येतो त्याप्रमाणे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंना घडविले जाते. जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे गेल्या २३ वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे. शिस्त, वेळेचे महत्त्व, शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर होऊन सर्वांगिण व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम समर कॅम्प मधून होत असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे मोबाईल व टीव्ही वरील स्क्रिन टाईम मुलांचा खूप वाढला आहे. त्यातून मुलांना काहीअंशी बाहेर काढता आले याचेही समाधान आहे.
सुयश बुरूकुल यांनी समर कॅम्प विषयी आढावा घेतला. गिरीश कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. वरूण देशपांडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
समर कॅम्प मधील यशस्वी खेळाडू
बॅडमिंटन ः भव्य रूणवाल, काव्या पाटील, अद्वय जोशी, स्मित सरोदे, मुकुंदा चौधरी, दुर्वा शिंपी, ऋग्वेदा सराफ.
टेबल टेनिस ः दर्शील सोनवणे. बास्कटेबॉल ः अंकिता बीडकर, डिम्पल कराळ, देवशेखर सोनार, विनित म्हसकर.
बुद्धिबळ ः कुशन चौधरी, गौरव बारी, मोनीश वागदे, काव्या चौधरी, प्रेरणा पाटील, विराट बोरसे, वंश सोनवणे, हर्षदा पाटील.
फुटबॉल ः दुर्वांकर पाटील, विजय ठाकरे, आकांक्ष दिवारी, दीप सोनवणे, नाहुश वर्मा.
तायक्वांदो ः आराध्या पाटील, पुर्वेश विदाते, कोमल गाढे, मयूर पाटील, गुरू करांडे.
कॅरम ः आरूषी सोलासे, धीरज घुगे, अल्फेज पिंजारी, रिहान तलरेजा, साहिल सोनवणे, अप्रतिम घारगे, निधी शिरखे.
क्रिकेट ः श्रेयश पोलभुने, रुद्रा लाडवंजारी, स्पर्श बियाणी, केशव मालु, हर्षल काळे, किरण निकम, क्रिष्णा काबरा, दिव्या शिंदे.