
पोलिस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते सत्कार
उमरगा : नाशिक येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेत उमरगा तालुक्यातील मुरूम येथील गुरुकुल प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पाच सुवर्ण पदक व एक रौप्य अशी सहा पदकांची कमाई केली.
पोलिस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर व देश पातळीवर यशस्वी नाव कोरून दैदिप्यमान कामगिरी केली आहे. यापुढे सातत्य ठेवून यशस्वी कामगिरी करतील असे आवाहन केले. या स्पर्धेत देवांस चिलोबा, राजवीर चौधरी, गोविंद रूपनूर, प्रत्युषा सोमवंशी, लावव्या वाघमारे यांनी सुवर्ण पदक मिळवून दैदिप्यमान कामगिरी केली. तेजस्विनी पाटील हिने रौप्य पदक मिळवले.
शाळेच्या वतीने मुरूम येथे गुरुकुल शाळेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावर्षी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूमचे राजू मिनियार, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पोलिस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव, विठ्ठलराव पाटील, डॉ राहुल चिलोबा, बोळेगावचे सरपंच विलास पाटील, केसर जवळगाचे माजी सरपंच अमोल पटवारी, गोविंद रुपनुर बोळेगाव यांची उपस्थिती होती.
यशस्वी विद्यार्थ्यांना घडवणारे महंमद रफी शेख, संस्थेचे सचिव आनंद चौधरी, सदस्य दिवाकर पाटील यांनी सखोल मार्गदर्शन करुन यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मयुरी चौधरी यांनी केले. अनिता वडतिले यांनी आभार मानले. यावेळी भूषण मडोळी, रियाज नूरसे, पोद्दार, सोभाजी, भाग्यश्री कुंभार यांची उपस्थिती होती. यावेळी माता पालक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.