
जळगाव ः राज्यस्तरीय आंतर जिल्हा खुला गट महिला फुटबॉल स्पर्धा पालघर येथे होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा संघ निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १५ मेपासून सकाळी ७ ते ९ या वेळात होणार आहे.
या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड घेऊन सकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, छाया पाटील, वर्षा सोनवणे, राहील शेख, वसीम शेख यांच्याशी संपर्क साधावा व आपली नावे सीएसआरमध्ये नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे व सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.