
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत एसबीओए शाळेचा विद्यार्थी सार्थक नलावडे याने ८९ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
बॅडमिंटन खेळाडू सार्थक नलावडे याने राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत अनेक पदके प्राप्त केली आहेत. क्रीडा क्षेत्रातील नियमित सरावाबरोबरच सार्थक याने शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही आणि दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविले आहेत.
या घवघवीत यशाबद्दल एसबीओए शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा पुरंदरे, क्रीडा शिक्षिका मनीषा यादव, महेश भावसार, योगिता मानवतकर तसेच बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, क्रीडा शिक्षक हिमांशू गोडबोले, चेतन तायडे, सदाशिव पाटील, संदीप जगताप, क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, ऋतुपर्ण कुलकर्णी, अमित सानप, गुरमीत सिंग, जावेद पठाण, निकेत वराडे, अतुल कुलकर्णी, परीक्षीत पाटील, सदानंद महाजन, नरेश गुंडले, राजेश जाधव, मनीष शर्मा, पवन लेंभे, गणेश पवार, अनिल बनकर, दिगंबर गंगावणे, निलेश गाडेकर यांनी सार्थकचे अभिनंदन केले आहे. सार्थक नलावडे याची ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील साई ॲकॅडमीत क्रीडा प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे हे विशेष.