प्रफुल मोरेचा फारुकीवर शानदार विजय  

  • By admin
  • May 13, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

मुंबई ः नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उप उपांत्य सामन्यात मुंबईच्या प्रफुल मोरेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ठाण्याच्या झैद अहमद फारुकीला २५-१७, १७-२५ व २१-८ असे हरवून उपांत्य फेरी गाठली.

पुण्याच्या सागर वाघमारेने उप उपांत्य लढतीत रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीला सहज हरवून उपांत्य फेरी गाठली. रियाझने उप उपान्त्य पूर्व फेरीत विश्व् विजेत्या संदीप दिवेवर मात केली होती. महिला एकेरीच्या उप उपांत्य लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने पहिल्या सेटच्या दुसऱ्या बोर्डात व्हाईट स्लॅमची नोंद करत मुंबईच्या नीलम घोडकेवर  सरळ मात करत उपांत्य फेरी गाठली. ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबईच्या रिंकी कुमारीचा अतिशय चुरशीच्या लढतीत असा पराभव केला. या सामन्यात रिंकीने तिसऱ्या सेटमध्ये तिसऱ्या बोर्डात व्हाईट स्लॅमची नोंद केली होती. आतापर्यंत या स्पर्धेत एकंदर २५ व्हाईट व  ५ ब्लॅक स्लॅम्स ची नोंद करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *