
सेजल कुलकर्णीला रौप्यपदक
छत्रपती संभाजीनगर ः कराटे-डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित कॅडेट, ज्युनिअर व सब-ज्युनिअर कराटे चॅम्पियनशिप ही राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रणक उमेश शर्मा याने कुमिते प्रकारात सुवर्णपदक आणि सेजल सारंग कुलकर्णी हिने रौप्यपदक पटकावले.
पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे रणक उमेश शर्मा याने कुमिते प्रकारात सुवर्ण पदक, तर सेजल सारंग कुलकर्णी हिने कुमिते प्रकारात रौप्य पदक पटकावले. रणक शर्माच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची कराटे इंडिया ऑर्गनायझेशनतर्फे देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दोघांच्याही यशाबद्दल राज्य संघटनेचे सचिव संदीप गाडे, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष जितु चंदनशिवे व सचिव मुकेश बनकर यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. यशामागे प्रशिक्षक विनोद सिद्धार्थ नवतुरे यांचे मार्गदर्शन आणि स्पर्धेतील पंच क्रांतिश्वर बनकर यांचे मोलाचे योगदान आहे.