
पुणे ः लोहगाव परिसरातील “गाथा स्पोर्ट्स अकॅडमी” च्या लोहगाव पंचक्रोशीतील पहिल्याच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन या अकॅडमीचे प्रमुख आधारस्तंभ ॲड आदित्य दिपक खांदवे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे प्रशिक्षित बॉक्सिंग कोच सनी साळवे आणि राहुल साळवे हे या अकॅडमीमध्ये प्रशिक्षक म्हणून नक्कीच चांगली कामगिरी करतील, असे ॲड आदित्य दीपक खांदवे यांनी सांगितले.
शालेय मुलांना सोशल मीडियाच्या विळख्यापासून लांब ठेवण्यासाठी व बॉक्सिंग या खेळाच्या माध्यमातून त्या मुला-मुलींना स्वसंरक्षण तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते व ही आज काळाची गरज आहे, असे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी सांगितले.
या प्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सुर्यवंशी, पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष विनोद कुंजीर, बॉक्सिंग कोच विशाल जाधव, निलेश अवसरे, गौतम साळवे, अंजनीकुमार जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक साळवे यांनी केले. तसेच रोहन साळवे यांनी आभार मानले.