
छत्रपती संभाजीनगर : देवास (मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर आणि ज्युनियर मुलांच्या नाइन ए साईड फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दोन्ही गटात कांस्यपदक जिंकून स्पर्धा गाजवली.
देवास येथील श्रीमंत तुकोजी पवार स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सबज्युनियर व ज्युनियर मुले अशा दोन्ही गटात कांस्यपद प्राप्त केले आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश संघावर १-० असा विजय नोंदवत कांस्यपदक पटकावले. या संघात वत्सल तुषार माकवाना (कर्णधार), अंश वानखडे (उपकर्णधार), आदित्य गवाडे. ओजस पाटील, सोहम सोंगिरे, सुवर्णिम टाकरखेडे, अमोघ शेट्टी, उत्कर्ष परिवार, प्रणव बुंदे, आयुष डांगे, रोहित कोकणे, अथर्व शिंदे, स्वराज चिखलकर, अभय साबळे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे प्रशिक्षक अभिजीत साळुंके व व्यवस्थापक आयुष आडे हे होते.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात तृतीय स्थानासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात सामना झाला. यात महाराष्ट्र संघाने ४-० असा सामना जिंकला आणि कांस्यपद संपादन केले. या संघात आर्यन कदम (कर्णधार), अभिषेक नाटकर (उपकर्णधार), नमित साधवानी, ईश्वर मोगली, कल्पेश तांबे, निक्षित काळे, शेख सालेक शेख शाकीर, अक्षत रावत, शुभआनंद आंबोरे, स्वरीत जाधव, अनसर विकार सय्यद, रणजीत पोल, आदित्य गावडे, वत्सल तुषार मकवाना या खळाडूंचा समावेश आहे. या संघाचे प्रशिक्षक समीर जमीर सय्यद व व्यवस्थापक प्रा एकनाथ साळुंके हे होते.
या संघांनी राष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही गटात यश प्राप्त केल्यामुळे खेळाडूंचे नाईन साईड फुटबॉल इंडिया सेक्रेटरी प्रवीण सांगते, सम्यक देसाई, परवेज खान, अमित बालिया, राज्य अध्यक्ष राजेंद्र पवार, महाराष्ट्र महासचिव प्रा एकनाथ साळुंके, राज्य संघटनेचे सहसचिव संतोष खेंडे, राज्य पदाधिकारी दिनेश म्हाला, लाल सिंग यादव, अनिल सहारे, मेंघाश शिंदे, प्रमोद साव, तिर्थनात गाढवे, रेखा साळुंके, प्रवीण आर्नाळे, शुभम सपकाळे, नागेश वारदे, अभिजीत साळुंके, बद्रुद्दीन सिद्दिकी, लाईक खान, सुलतान खान, शेख नजीर, डी आर खैरनार, डॉ रणजित पवार, गणेश बेटूदे, पांडुरंग कदम, बाजीराव भुतेकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, डॉ उदय डोंगरे, प्रा राकेश खैरनार, सागर तांबे, गोकुळ तांदळे, पंकज भारसाखळे, गोविंद शर्मा, सतीश पाठक, माणिक राठोड यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.