बुद्धिबळ स्पर्धेत मानस गायकवाड विजेता

  • By admin
  • May 15, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

विविध वयोगटात ओम, सृष्टी, विहान, मुसळे, नमन व तन्वी विजेते

सोलापूर ः जीएच रायसोनी मेमोरियल चषक बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सोलापूरच्या मानस गायकवाड याने ६.५ गुण व सरस बोकोल्स गुणांवर विजेतेपद, चषक व रोख ७ हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. पुण्याच्या ओम लामकाने याने ६.५ गुणांसह उपविजेतेपद आणि रोख ५ हजार रुपये प्राप्त केले. तसेच बार्शीचा शंकर साळुंकेने तिसरा, पुण्याचा आंतरराष्ट्रीय कॅंडिडेट मास्टर प्रथमेश शेरला याने चौथा व लातूरचा अथर्व रेड्डी याने उल्लेखनीय खेळत पाचवा क्रमांक मिळविला.

जीएच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेलफेअर फाऊंडेशन व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित ही बुद्धिबळ स्पर्धा जुळे सोलापूर येथील टाकळीकर मंगल कार्यालय येथे झाली. फाउंडेशनचे सचिव भूषण श्रीवास यांनी ही स्पर्धा प्रायोजित केली होती.

या स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात ओम चीनगुंडे याने तर खुल्या गटात मुलींमध्ये सृष्टी गायकवाड हिने अव्वल क्रमांक पटकाविला. ११ वर्षांखालील मुलांच्या गटात विहान कोंगारी, श्रेयस कुदळे तसेच मुलींच्या गटात सृष्टी मुसळे व संस्कृती जाधव यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. चौघांचीही अकरा वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ८ वर्षांखालील गटात मुलांमध्ये नमन रंगरेज व मुलींमध्ये तन्वी बागेवाडी हिने सुरेख खेळ करत जेतेपद पटकावले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण गायनोलॉजिस्ट डॉ शिरीष कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखाली टाकळीकर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापिका नीलम उपाध्ये, संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, भरत वडीशेरला, अभिजीत बावळे, यश इंगळे, रुपाली कोरे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.

विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स व रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. विजेत्या ७५ खेळाडूंना एकूण ४१ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. विजेत्या खेळाडूंचे सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड आदींनी अभिनंदन केले.

स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, गुण) : खुला गट : मानस गायकवाड (६.५), ओम लामकाने (६.५), शंकर साळुंके (६), प्रथमेश शेरला (५), अथर्व रेड्डी (५), वरद लिमकर (५), अमोल वाघमोडे (५), प्रज्वल कोरे (५), स्वप्नील हदगल (५), सार्थक हुडे (५), हर्ष हलमल्ली (४.५), अरित्र दास (४.५), महेश कारंजकर (४.५), तनिष्क शहा (४), सागर गांधी (४).

उत्कृष्ट मुली : सृष्टी गायकवाड (५), सान्वी गोरे (५), श्रावणी देवनपल्ली (४), स्वराली हातवळणे (४), तनिष्का जाधव (४), कृष्णा डोंगरे (३.५), प्राप्ती तोडकर (३), ऋतुपर्ण विजागत (३), नवीना वडिशेरला (३), फराह शेख (२).

१५ वर्षे वयोगट : ओम चिनगुंडे (५), श्रेया संदूपटला (५), वेदांत मुसळे (५), श्लेष उदगीरी (४), मल्हार वाघे (४), शंभूराज कन्हेरे (४), युवराज गायकवाड (४), अन्वय कुलकर्णी (४), श्रीवीर जिल्ला (४), वेद आगरकर (४).

११ वर्षे मुले : विहान कोंगारी (५.५), श्रेयस कुदळे (५), शशांक जमादार (५), श्रेयस इंगळे (४.५), देवराज कन्हेरे (४.५), वेदांत पांडेकर (४), ओम राऊत (४), नैतिक होटकर (४), विवान दासरी (४), हर्ष जाधव (४.५).

११ वर्षे मुली : सृष्टी मुसळे (४), संस्कृती जाधव (४), अन्वी गर्जे (४), पृथा ठोंबरे (४), गोवर्धनी मिठ्ठा (३), हर्षिता भोसले (३), आरोही दलाल (३), तेजस्विनी कांबळे (३), वेदिका स्वामी (३), मनस्वी क्षीरसागर (२.५).

८ वर्षे मुले : नमन रंगरेज (५), नियान कंदीकटला (४), विवेक स्वामी (३), अजिंक्य कांबळे (३), ऋषांक कंदी (३), अद्विक ठोंबरे (२), आविष्कार दलाल (१), विराज शेंडगे (१).

८ वर्षे मुली : तन्वी बागेवाडी (१), श्रेया पैकेकरी (१), हर्षा क्षीरसागर (१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *