< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत अनुष्का पाटीलचा डबल धमाका – Sport Splus

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत अनुष्का पाटीलचा डबल धमाका

  • By admin
  • May 15, 2025
  • 0
  • 53 Views
Spread the love

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये सुवर्ण अन् रौप्यपदकाची कमाई, सारा राऊळला कांस्य

नवी दिल्ली ः रिदमिक प्रकारात पदकांची लयलूट केल्यानंतर सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राने पदकांचा धडाका कायम राखला. मुंबईच्या अनुष्का पाटीलने सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून दिवस गाजवला.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्‍या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मुंबईच्या १६ वर्षीय अनुष्काने बुधवारी तर कमाल केली. तिने अनइव्हन बार प्रकारात सुवर्णपदक जिंकले. शिवाय टेबल वॉल्ट प्रकारात ती रौप्य पदकाची मानकरी ठरली. याच प्रकारात मुंबईच्या सारा राऊळ हिने कांस्यपदक मिळवले.

anushka patilof mahrastra gold ,sneha tariyal delhi silver and nishika aggarwal of telengana bronze in women junior uneven bars

अनइव्हन बार प्रकारात अनुष्काने १०.४३३ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. अनुष्का ही विशाल कटकदौंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ९.८३३ गुण घेणारी यजमान दिल्लीची स्नेहा तरिया रौप्य पदकाची मानकरी ठरली. तेलंगणाच्या निशिका अगरवालने (९.७००) कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राची उर्वी वाघ ९.०६७ गुण घेत चौथ्या क्रमांकावर राहिली.

टेबल वॉल्ट प्रकारात अनुष्काचे सुवर्ण केवळ ०.२३४ गुणांच्या फरकाने हुकले. तेलंगणाच्या निशिका अगरवाल हिने १२.३३४ गुण घेत सुवर्णपदक आपल्या नावे केले. रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या अनुष्काने १२.१०० गुण मिळवले. १६ वर्षीय सारा राऊळने ११.७०० गुण मिळवत कांस्यपदक आपल्या नावे केले. ती महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. साराने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते.

ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे : अनुष्का पाटील

वयाच्या चौथ्या वर्षापासून जिम्नॅस्टिकचे वेड जोपासलेल्या अनुष्काला देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळायचे आहे. भारताची दीपा कर्माकर आणि अमेरिकेची सुवर्णपदक विजेती शॉन जॉन्सन या तिच्या आवडत्या जिम्नॅस्ट आहेत.

अनुष्काचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीस असून आई गृहिणी आहेत. एमजेएफ तसेच खेलो इंडियाकडून तिला आर्थिक सहाय्य मिळते. न सांगता कठोर मेहनत घेण्याची तयारी, सरावात सातत्य आणि  सतत शिकण्याची तसेच आपले कौशल्य सुधारण्याची वृत्ती ही अनुष्काची खासियत आहे. ती आपल्या खेळाबाबत सिरियस आहे. जास्तीत जास्त सराव करून खेळात सुधारणा करण्याचा तिचा प्रयत्न असतो. अलीकडे हा गुण फार कमी खेळाडूंमध्ये दिसून येतो, असे अनुष्काचे प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *