< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गायत्री बडेकरला विक्रमासह सुवर्णपदक  – Sport Splus

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गायत्री बडेकरला विक्रमासह सुवर्णपदक 

  • By admin
  • May 15, 2025
  • 0
  • 60 Views
Spread the love

मुंबई ः देहरादून (उत्तराखंड) येथे नुकत्याच झालेल्या आशियाई सबज्युनिअर, ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सब ज्युनिअर महिलांच्या गटात आयएनडी वेटलिफ्टिंग-पॉवरलिफ्टिंग क्लब कर्जतची सबज्युनिअर खेळाडू गायत्री बडेकर हिने ४३ किलो वजनी गटात शानदार सुवर्ण पदक पटकावले.

स्कॉट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात गायत्री हिने जुने आशियाई विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावे केले. तसेच तिन्ही प्रकारात ३२५ किलो सर्वाधिक वजन उचलून नवीन विक्रम नोंदवला.

सध्याची आशिया खंडातली तसेच भारतातील एकमेव पॉवरलिफ्टर जिने स्कॉट, बेंच आणि डेडलिफ्ट आणि एकूण असे एकाच वेळी चारही प्रकारात नवे विक्रम नोंदवले आहेत. कर्जत येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या गायत्रीला राष्ट्रीय कुस्ती वेटलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टिंग खेळाडू हनुमंत खरात यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सरावासाठी अंजली येवले आणि प्रथमेश भालेकर यांचे सहकार्य मिळाले.

ऑर्किड कॉलेज कशेळे कर्जतची विद्यार्थिनी असलेली मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीने पहिल्याच प्रयत्नात सबज्युनिअर स्पर्धेत भारतीय संघातर्फे भाग घेऊन ४ सुवर्णपदके प्राप्त केली. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश शरद वेदक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी गायत्रीचे खास अभिनंदन केले आहे. या अगोदर रायगडच्या सलोनी मोरे, अमृता भगत यांनी आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती. तसेच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी गायत्रीचे विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *