
छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग ः मयंक कदम सामनावीर
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ओंकार रोडवेज संघाने रजनी क्रिकेट अकादमी संघावर पाच विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात मयंक कदम याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. ओंकार रोडवेज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रजनी क्रिकेट अकादमी संघाने २० षटकात सात बाद १०५ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना ओंकार रोडवेज संघाने १९.३ षटकात पाच बाद १०६ धावा फटकावत पाच विकेट राखून विजय साकारला.
या सामन्यात मयंक कदम याने ३९ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने सात चौकार मारले. झैद खान याने ४३ चेंडूत सहा चौकारांह ४१ धावांची जलद खेळी केली. कार्तिक गेहलोत याने दोन चौकारांसह २२ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत इशांत बबीरवाल याने १० धावांत दोन गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. मयंक कदम याने १३ धावातं दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवत सामनावीर पुरस्कार संपादन केला. कार्तिक जैस्वाल याने १२ धावांत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
रजनी क्रिकेट अकादमी ः २० षटकात सात बाद १०५ (कार्तिक गेहलोत २२, स्वराज पाटील ११, झैद खान ४१, इशांत बबीरवाल ६, कार्तिक जैस्वाल ७, मयंक कदम २-१३, थोरात १-१३, शुभ मुथा १-१७, स्वप्नील जाधव १-११, दक्ष हाके १-५) पराभूत विरुद्ध ओंकार रोडवेज ः १९.३ षटकात पाच बाद १०६ (पृथ्वीराज मते ११, प्रत्युष गर्ग १४, मयंक कदम नाबाद ४५, फैजान १३, इतर १५, इशांत बबीरवाल २-१०, कार्तिक जैस्वाल १-१२, स्वराज झिनजन पाटील १-१४). सामनावीर ः मयंक कदम.