
छत्रपती संभाजीनगर : कासलीवाल पूर्वा हाउसिंग सोसायटी, एअरपोर्ट समोर, चिकलठाणा येथील रहिवासी लीला नामदेव कड (वय ७३) यांचे १५ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चिकलठाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या विकास अध्ययन केंद्र, मुंबईच्या समन्वयक आणि सामाजिक विश्लेषक रेणुका कड आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश कड यांच्या आई होत.