
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील क्यूट डकलिंग्ज पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी राष्ट्रीय बुद्धिबळपटू सानी देशपांडे हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विशेष म्हणजे, २०२४ साली वेल्लोर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सानी देशपांडे हिला अतिरिक्त गुण मिळाले. ज्यामुळे परीक्षेत १०० गुणांचा परिपूर्ण आकडा मिळाला. या शानदार यशाबद्दल सानीचे सर्वत्र कौतुक होत आहे.