खेलो इंडिया बीच स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा सेपक टकरा संघ जाहीर 

  • By admin
  • May 16, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

परभणी ः पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा सेपक टकारा संघ या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आला आहे. हा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. ही स्पर्धा दीव-दमण या ठिकाणी १९ ते २४ मे या कालावधीत होणार आहे. 

राज्याचा क्रीडा विभाग आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या सेपक टकरा संघाचे प्रशिक्षण शिबीर रायगड येथे घेण्यात आले. अलिबाग बीचवर सेपक टकरा संघाने कसून सराव केला. 
या संघास शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, क्रीडा अधिकारी आकाश डोंगरे, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक गणेश माळवे, निवड समिती सदस्य वैभव शिंदे उपस्थित होते.

क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, क्रीडा उपसंचालक उदय जोशी, नवनाथ फडतरे, सुहास पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, सेपक टकारा संघटनेचे राज्य अध्यक्ष विपीन कामदार, राज्य सरचिटणीस डॉ योगेंद्र पांडे, राज्य उपाध्यक्ष प्रवीण कुपटीकर, डॉ अमृता पांडे, डॉ विनय मुन, शेख चाँद, रवी बकवाड, परवेज खानयांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघ 
लेखांशु लडके, सौरभ कोसुळकर, ओम मुळे (वर्धा), इर्शाद सागर, समीर थूल, मोहम्मद अली, मोहम्मद सोहेल (नागपूर), अमोल राठोड, सुकुमार तिवारी (नाशिक), सुदेश कांबळे (नांदेड), फैझान शेख (जळगाव), ऋषिकेश यादव (ठाणे), प्रशिक्षक : गणेश माळवे  (परभणी), सह प्रशिक्षक दर्शन हस्ती (वर्धा), संघ व्यवस्थापक विकास माने, क्रीडा अधिकारी (पुणे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *