परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना सर्वसुविधा पुरवणार 

  • By admin
  • May 17, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांचे प्रतिपादन

  • रौप्य पदक विजेत्या कबड्डीपटूंचा सत्कार 

परभणी ः बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी संघाने चमकदार कामगिरी बजावत रौप्यपदक पटकावले. परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी संघाने शानदार यश संपादन केले. 

खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र कबड्डी संघाला मिळाले. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन व युनिटी फाऊंडेशनचे गोविंद गणेशराव जाधव (धारासूर) व ऋषिकेश बन्सीधरराव जाधव (धारासूर) यांनी सांघिक रौप्यपदक संपादन केले. या शानदार कामगिरीबद्दल खेळाडू व जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखऱे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे या खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन करतात व‌ खेळाडूंना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करतात हे विशेष उल्लेखनीय आहे. 

ग्रामीण भागातील व शहरी भागातील खेळाडूंना योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी मुलींसाठी प्रशिक्षण शिबीर राबवले. आज त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू पोलिस दलात कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला पदक मिळवण्यासाठी जितकी धडपड खेळाडूंची असते तितकीच गीता साखरे यांची देखील असते.

परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार. तसेच परभणी जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देणार असे परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी यावेळी सांगितले.

रौप्यपदक विजेते खेळाडू आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांचा सत्कार युनिटी फाऊंडेशन परिवारातील गोविंद भाऊ अवचार यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सुनील शिंदे, सूर्यकांत सातपुते, भरतराव घांडगे, परमेश्वर जाधव, योगेश आदमाने, रग्बी संघटनेचे पदाधिकारी व युनिटी फाऊंडेशन परिवारातील कबड्डी खेळाडूंनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *