
अकोला ः अकोला येथे एशियन पेसापालो स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी निवड चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा समारोप नुकताच झाला आहे.
पेसापालो फेडरेशन ऑफ इंडिया, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, वर्ल्ड गेम, पेसापालो फेडरेशन महाराष्ट्र आणि अकोला जिल्हा पेसापालो असोसिएशन यांच्या वतीने अकोला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथे तिसऱ्या एशियन पेसापालो स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडण्यासाठी निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सबज्युनिअर, ज्युनियर आणि सीनियर मुले व मुली सहभागी झाले होते. या निवड चाचणी शिबिरातून निवड झालेल्या खेळाडूंनी निवड २८ ते ३० मे या कालावाधीत थिंपू भुतान येथे होणाऱ्या एशियन पेसापालो गेम स्पर्धेसाठी झाली आहे.
या शिबिराचा समारोप गिताई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव चोपडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश फाटे, अॅड मोरवाल, शशिकांत चोपडे, योगेश ढोरे पाटील, डॉ अनिलराव देशमुख, प्रशांत जंजाळ, अश्विन शिरसाट, हेमंत गवई, मधुसूदन मारवाल, जिल्हा सचिव रामेश्वर राठोड, संजय बारतासे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारतासे यांनी केले. सचिव रामेश्वर राठोड यांनी आभार मानले.
या निवड चाचणी शिबिरात श्रेयश राठोड, परिमल पेठे, शाश्वत तेलगोटे, मयूर राठोड, आर्यन शिरसाट, सोहम मेहरे, वंश मेहरे, यश पाटील, विराज शर्मा, मोहित भुरे, ध्रुव पाटील, देवांश कोळी, सुबोध इंगळे, समीर सुरवाडे, सोहम कोंडे, सार्थक बारतासे, आराध्य गवई, रुद्र महाजन, ध्रुव काळे,प्रथमेश मेहरे, स्नेहा टोबरी, तनुजा इंगळे, हर्षिता धवसे, प्रणाली धवसे, साक्षी सोनवणे, श्रेया गावलकर, गौरी राणे, भक्ती येळने, खुशी चोपडे, स्नेहा उंबरे, भक्ती पारस्कर, आरुषी उगले, चैताली मुळतकर, श्रावणी बावस्कर, खुशी चौधरी, अक्षरा सातव, श्रेया मेहेरे, दर्शिका राठोड या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
शशिकांत चोपडे, मोरवाल व मेघशाम शिंदे, चेतन पागावाड यांनी सर्व भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना थिंपू (भूतान) या देशात येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.