
टी २० सामन्यात यूएई संघाचा २७ धावांनी पराभव
शारजाह ः शारजाह येथे झालेल्या यूएई विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात बांगलादेशचा फलंदाज परवेझ हुसेन इमॉन याने इतिहास रचला आहे. परवेझच्या शानदार कामगिरीमुळे बांगलादेश संघाने २७ धावांनी सामना जिंकला.
युएई विरुद्धच्या सामन्यात परवेझ हुसेन इमॉन याने तुफानी फलंदाजी केली आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचवला. परवेझ हुसेन इमॉन याने शानदार शतकी खेळी करत यूएईच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. २२ वर्षीय परवेझ हुसेन इमोन हा टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारा दुसरा बांगलादेशी फलंदाज ठरला आणि त्याच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला. परवेझ हुसेन इमॉन हा आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वात जलद शतक करणारा बांगलादेशी फलंदाज ठरला.
बांगलादेशसाठी सर्वात जलद टी २० शतक
परवेझने २०१६ मध्ये तमिम इक्बालने ६३ चेंडूत १०३ धावा केल्याचा विक्रम मोडला. परवेझने सामन्यात फक्त ५३ चेंडूत शतक ठोकण्याची अद्भुत कामगिरी केली. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम साहिल चौहानच्या नावावर आहे. साहिलने २७ चेंडूत शतक ठोकण्याची अद्भुत कामगिरी केली आहे. या सामन्यात परवेझ हुसेन इमोन ओपनिंग करण्यासाठी आला. त्याने १०० धावांच्या खेळीत ५४ चेंडूंचा सामना केला. या डावात परवेझ हुसेनने ५ चौकार आणि ९ षटकार मारून यूएईच्या गोलंदाजांना धुडकावून लावले.
पहिला बांगलादेशी फलंदाज
परवेझ हुसेनने या डावात ९ षटकार मारले, जे बांगलादेशच्या फलंदाजाने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा एक मोठा विक्रम आहे. २०१६ मध्ये ओमानविरुद्धच्या सामन्यात तमिमने ६३ चेंडूत १०३ धावांची खेळी केली होती, तेव्हा बांगलादेशी फलंदाजाने त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार मारण्यात यश मिळवले होते. त्याच वेळी, परवेझ हुसेन हा बांगलादेशकडून टी २० आणि टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक करणारा फलंदाज आहे. त्याने बांगलादेशकडून टी २० मध्ये ४२ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ गडी गमावून १९१ धावा केल्या, तर दुसरीकडे, युएई संघ २० षटकांत फक्त १६४ धावाच करू शकला. बांगलादेशने हा सामना २७ धावांनी जिंकण्यात यश मिळवले.