
जळगाव ः राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा १४ वर्षांखालील मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील मुलींची फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा शिरपूर येथे १९ मे पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा मिलिटरी हायस्कूल मैदानावर होणार आहे.
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या कार्याध्यक्ष डॉ अनिता कोल्हे यांनी संघाची घोषणा केली. यावेळी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष इम्तियाज शेख, सचिव फारुक शेख यांनी शुभेच्छा दिल्या.
जळगाव जिल्हा फुटबॉल संघात संस्कृती पाटील, अश्विनी लक्ष्मीकांत, दिव्या बाविस्कर, परी रंगलानी, मनस्वी जाधव, इशा ढाके (भुसावळ), युक्ती राजपूत, आरोही राणे, वेदश्री पाटील, नजम फरहाज बोहरी, रितिका पाटील, यशवंती पवार, दर्शना कुंभार (तामसवाडी), आराध्या पाटील, धनश्री भोई (तामसवाडी), युगा पाटील, अनन्या पाटील, अलीना स्वामी फ्रान्सिस (भुसावळ) या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे. या संघाच्या व्यवस्थापकपदी छाया बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संघाचे प्रशिक्षक म्हणून राहील अहमद यांची निवड करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी फारुक शेख, अनिता कोल्हे, राहील अहमद, गुंजा विश्वप्रसाद, इम्तियाज शेख, हिमाली बोरोले, छाया बोरसे आदी उपस्थित होते.