
अष्टपैलू सागर चेंबूरकर आणि निशित श्रियान चमकले
आरबीआय शील्ड क्रिकेट स्पर्धा
मुंबई : ६३ व्या सर बेनेगल रामा राव आरबीआय शील्ड टी २० स्पर्धेच्या एलिट सामन्यांमध्ये रविवारी सिटी बँक एनएस स्पोर्ट्स क्लब आणि ड्यूश बँकेच्या अनुक्रमे बँक ऑफ बडोदा आणि एसबीआय बँक संघांविरुद्धच्या विजयात अष्टपैलू सागर चेंबूरकर आणि निशित श्रियान चमकले.
चेंबूरकरने त्याच्या संघासाठी २६ धावा केल्या आणि १३ धावांत ३ विकेट घेतल्या. श्रियानने २७ धावांत २ विकेट टिपल्यानंतर फलंदाजीत महत्वपूर्ण योगदान देत ३६ धावांची नाबाद खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
१) सिटी बँक एनए स्पोर्ट्स क्लब – २० षटकांत ८ बाद १३६ (पुनीत गमनानी ५०, सागर चेंबूरकर २६, नितीन देशमुख २/३०, रोहित शर्मा २/१८, परमेश्वर जाधव २/१४) विजयी विरुद्ध बँक ऑफ बडोदा – २० षटकांत ७ बाद ८१ (अमित उपाध्याय नाबाद ४६; सागर चेंबूरकर ३/१३, सुशांत शेट्टी २/८, मिहीर घरत २/८).
२) एसबीआय बँक – २० षटकांत ६ बाद १५२ (गणेश मकुटे ३०, मयंक रंजन ३३, गौतम यादव नाबाद २८, समीर देसाई ३/२८, निशित श्रीयान २/२७) पराभूत विरुद्ध ड्यूश बँक – १९.१ षटकांत ७ बाद १५३ (फेलो डि’सिल्वा ३७, निशित श्रीयान नाबाद ३६, गौतम यादव ३/१९, अमेय उबाळे ३/४५).