
मुंबई ः शिरला तालुक्यातील रेड येथील तानुबाई व कृष्णा तुकाराम जाधव आणि छाया शिवाजीराव जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती मैदानमध्ये एक नंबरच्या कुस्ती मध्ये माऊली जमदाडे याने प्रेक्षणीय कुस्ती करून विजय मिळवला.
दोन नंबरच्या कुस्तीमध्ये उदय खांडेकर, तीन नंबरच्या कुस्तीमध्ये नामदेव केसरे, चार नंबरच्या कुस्तीमध्ये विशाल जाधव यांनी प्रेक्षणीय कुस्ती करून विजय मिळवला. अशा अनेक शानदार कुस्त्या झाल्या.
या मैदानात अंत्री बुद्रुकचे सुपुत्र पै वसंतराव पाटील यांनी आजवर कुस्ती ठी दिलेल्या योगदानाबद्दल कुस्ती भूषण पुरस्कार २०२५ देऊन गौरवण्यात आले. शिराळा तालुक्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, विजयराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै नझरुद्दिन नायकवडी, वस्ताद शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आमदार सत्यजित देशमुख यांनी उपस्थित राहून सर्व पैलवानांना शुभेच्या दिल्या.