पाकिस्तान टी २० संघाची घोषणा, बाबर-रिझवान पुन्हा दुर्लक्षित 

  • By admin
  • May 22, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

कराची ः पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या महिन्यात होणाऱ्या देशांतर्गत टी २० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली. बांगलादेशविरुद्धच्या या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज हसन अलीचे संघात पुनरागमन झाले आहे, तर वरिष्ठ फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना पुन्हा एकदा दुर्लक्षित केले गेले आहे.

हसनने जवळजवळ तीन वर्षांत फक्त एकच टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. २०२४ मध्ये डब्लिनमध्ये झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन षटकांत ४२ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्जचे प्रतिनिधित्व करताना हसनने १५ विकेट्स घेतल्या आहेत.

रिझवान आणि बाबरकडे दुर्लक्ष
रिझवान आणि बाबर यांना झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाकिस्तानच्या शेवटच्या दोन मालिकांमधूनही वगळण्यात आले. पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषकाला लक्षात घेऊन पीसीबी त्यांच्या टॉप ऑर्डरमध्ये नवीन खेळाडूंना संधी देत असल्याचे मानले जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध १-४ असा पराभव पत्करावा लागलेल्या संघात निवडकर्त्यांनी आठ बदल केले आहेत.

या खेळाडूंना मिळाली संधी
वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, जहांदान खान आणि अब्बास आफ्रिदी यांच्या जागी हसन, नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांना संघात स्थान देण्यात आले आहे. सलामीवीर साहिबजादा फरहान, सैम अयुब आणि फखर जमान संघात परतले आहेत तर अष्टपैलू फहीम अशरफ आणि हुसेन तलत यांनाही पुन्हा संघात स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तान संघ 
सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान, अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारीस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरिस, मोहम्मद वसीम, इरफान खान, नसीम शाह, साहिबजादा फरहान आणि सैम अयुब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *