
अभिषेख खैरनार सचिवपदी तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत भाग्यवंत
नाशिक ः नाशिक जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र नाईक यांची तर सचिवपदी अभिषेक खैरनार यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेची सहविचार सभा १९ मे रोजी जे एस रूंगठा हायस्कूल येथे अध्यक्ष साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या सभेत पुढील पाच वर्षांसाठी नवीन कार्यकारणी एकमताने घोषित करण्यात आली. सभेसाठी जे पी पवार, संजय होळकर, संजय पाटील आदी उपस्थित होते.

या सभेत रवींद्र नाईक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदाची जबाबदारी अभिषेक खैरनार यांच्याकडे सोपवण्यात आली. चंद्रकांत भाग्यवंत यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. उपाध्यक्षपदी किशोर राजगुरू व रुपाली पाटील यांची निवड झाली आहे. खजिनदार म्हणून शरद जाधव तर सहसचिवपदी अनिल उगले व एम एम शेख यांची निवड करण्यात आली आहे.

मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त साहेबराव पाटील, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य एस काळे, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पी के थोरात तसेच रूंगठा.विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील आदींनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.