
सांगली ः जत तालुक्यातील मौजे रेवनाळ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्यातर्फे प्रमोद वाघमोडे यांची महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संपर्क प्रमुख मुंबई विभाग आणि ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी जय हनुमान पॅनलचे मार्गदर्शक दिलीपराव वाघमोडे, सरपंच नितीन थोरवे, उपसरपंच संजय वाघमोडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुरेशराव वाघमोडे, पंकज वाघमोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रमोद वाघमोडे यांनी ग्रामपंचायत सदस्यांमधील असलेले मतभेद गैरसमज मिटले पाहिजेत, गावाच्या विकासासाठी एकमताने सर्वांनी उभे राहिले पाहिजे आपापसातील किरकोळ वाद मिटवून गावाच्या विकासाच्या मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे, जास्तीत जास्त विकास कामे गावात कशी येतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगत सत्कार केल्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानून सर्वांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.