
सोलापूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यताप्राप्त भारतीय टेनिक्वाईट महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन यांच्या वतीने बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिक्वाईट पंच परीक्षेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ४ क्रीडा शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, महासचिव अनिल वरपे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनचे अध्यक्ष भीमराव बाळगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव इक्बाल शेख, माजी क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, सहसचिव धनंजय धेंडे आदी उपस्थित होते.
उत्तीर्ण झालेले पंच
विष्णू दगडे (गगनगिरी विद्यालय सांगवी, ता. पंढरपूर), सागर नरोनी (पंचाक्षरी विद्यालय माळकवठे, ता.दक्षिण सोलापूर), बापूराव बाबर, (वेताळ विद्यामंदिर शिर्डी, ता. मंगळवेढा), मनोज बाळगे, स्वामीनारायण गुरुकुल कुंभारी, ता.दक्षिण सोलापूर).