
भुसावळ : जळगाव जिल्हयातील एकमेव असलेली खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव या पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालकांच्या बैठकीत अध्यक्षपदी भुसावळ येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर येथील संतोष मराठे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पारोळा येथील जयहिंद प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक वना महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी खाजगी शाळा कर्मचारी पतसंस्था मर्यादित जळगावचे माजी अध्यक्ष बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संचालक प्रशांत साखरे, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, अविनाश घुगे, गणेश लोडते, अमित चौधरी, प्रफुल्ल सरोदे, धनंजय काकडे, रूपाली पाटील, तज्ञ संचालक अमोल भारंबे, निखिल जोगी आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, नरेंद्र चौधरी तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी आणि चोपडा तालुका संघटनेचे अध्यक्ष सुनील पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व मित्र परिवारातर्फे संतोष मराठे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.