
कोल्हापूर महिला संघ उपविजेता, सांगली संघ तृतीय
जळगाव ः ३०व्या सीनियर राज्य सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव संघाने विजेतेपद पटकावले तर कोल्हापूर संघाने उपविजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनची ३० वी सीनियर राज्य सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा महिला गट सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या वतीने पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली.
या स्पर्धेतील विजेत्यांना जी डी बापू लाड साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, किरण बोरवडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, प्राचार्य आर एस साळुंखे, उद्योजक अरुण ब्रम्हे, राज्य सहसचिव गोकुळ तांदळे, डॉ सूरज येवतीकर, किशोर चौधरी, अभिजित इंगोले, दर्शना येवतीकर, प्रीतिश पाटील, स्वप्नाली वायदंडे, ऐश्वर्या पुरी, नेहा देशमुख, शेषनारायण लोढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
राज्य सॉफ्टबॉल स्पर्धेतील अंतिम सामना जळगाव मनपा विरुद्ध कोल्हापूर जिल्हा यांच्यात झाला. या सामन्यात जळगाव मनपा संघाने २-१ होमरनने विजय नोंदवत अजिंक्यपद प्राप्त केले. तिसऱ्या क्रमांकासाठी सांगली जिल्हा आणि लातूर जिल्हा यांच्यात लढत झाली. यात सांगली संघाने ३-२ असा विजय साकारत तिसरा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत पंच म्हणून अक्षय येवले, प्रसाद यादव, संतोष अवचार, विकास वानखेडे, सुजय कल्पेकर, शिवाजी पाटील, कल्पेश कोल्हे, हर्षल मोरे, स्वप्नील गदाडे, शुभम काटकर, विष्णू जाधव, सोमनाथ गोंधळी, नदीम संधे, विनायक जाधव, अभिलाष शिरसाठ यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अरुण श्रीखंडे, नितीन हिंगमीरे, श्रीकांत मदने, संतोष साळुंखे, नदीम संधे, विनायक जाधव, अभिलाष शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.