बास्केटबॉल स्पर्धेत इंडियन कॅडेट मुलींच्या संघाला विजेतेपद

  • By admin
  • May 26, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

अंतिम सामन्यात ठक्कर फर्निचर संघाचा पराभव

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत मुलींच्या गटात इंडियन कॅडेट संघाने विजेतेपद पटकावले.

अंतिम सामना इंडियन कॅडेट्स आणि ठक्कर फर्निचर यांच्यात झाला. या सामन्यामध्ये इंडियन कॅडेट संघाने ६१-५७ अशा चुरशीच्या गुण फरकाने विजय मिळवला आणि अजिंक्यपद संपादन केले. रितवी त्रिभुवन हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला.

अंतिम सामन्यामध्ये विजयी संघाकडून गार्गी पाटील, प्रतीक्षा बरेटीया, सानिका तीदार, कृष्णा गायकवाड यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. उपविजयी संघाकडून केतकी ढंगारे, उन्नती डोंगरे, आकृती बाहेती, मोइशा खाडे, स्वराली पत्की यांनी चांगली झुंज दिली.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अॅड संजय डोंगरे, संदीप ढंगारे, महेश इंगळे, प्रदीप लाटे, अभिजीत शिंदे, स्वप्नील पेरक, अभय हजारी, सागर धटिंग, अजय सोनवणे, संदीप सातदिवे, समाधान बेलेवार, अल्केश डोंगरे, नरेंद्र चौधरी, शुभम लाटे, नीतू संभेराव, श्रद्धा भिकणे, मीनल पठाडे, रागिणी कुसाळे यांनी पुढाकार घेतला आहे.

विजेत्या संघाला प्रमुख अतिथी अन्वर सुतारी, सैफुद्दीन अब्बास, ज्येष्ठ विधिज्ञ एस आर नेहरी, बबलू त्रिवेदी, ॲड संजय डोंगरे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक संदीप ढंगारे, ज्ञानेश्वर जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *