< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी समर्थ, प्रगतीची निवड निश्चित – Sport Splus

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी समर्थ, प्रगतीची निवड निश्चित

  • By admin
  • May 26, 2025
  • 0
  • 102 Views
Spread the love

मुंबई ः किर्गिस्तान येथे होणाऱया २३ वर्षांखालील वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी मुंबईच्या साई एनसीओई केंद्राच्या समर्थ महाकवे आणि प्रगती गायकवाड या दोन कुस्तीपटूंची भारतीय संघात निवड झाली आहे.

साई एनसीओई मुंबई केंद्रासाठी ही दुहेरी अभिमानस्पद गोष्ट घडली आहे. उदयोन्मुख कुस्तीपटू समर्थ महाकवे व प्रगती गायकवाड यांनी चमकदार कामगिरी बजावत भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे.

लखनौ येथे २२ मे रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत समर्थ महाकवे याने वर्चस्व गाजवत ६० किलो ग्रीको-रोमन प्रकारात आपली निवड पक्की केली. २३ मे रोजी दिल्ली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रगती गायकवाड हिने ६२ किलो फ्रीस्टाइल प्रकारात लक्षवेधक कामगिरी बजावत आपले स्थान निश्चित केले. या कामगिरीबद्दल भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग चाटे यांनी दोन्ही कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *