
राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा
हिंगोली ः राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी हिंगोली जिल्ह्यातील उखळी येथील वैष्णवी विष्णू गायकवाड हिची निवड झाली आहे.
भारतीय नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने मध्यप्रदेश नेटबॉल असोसिएशन यांच्या वतीने अल्पाइन अकॅडमी इंदौर येथे २८ ते ३० मे दरम्यान चौथी सबज्युनिअर राष्ट्रीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीमधून निवड समिती सदस्य डॉ दिलीप जयस्वाल (चेअरमेन), श्याम देशमुख (संयोजक), समिर सिकीलकर, महेशकुमार काळदाते, शिवानी सांब्रेकर यांनी दोन्ही संघ जाहीर केले.
या संघात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळी येथील नेटबॉल खेळाडू वैष्णवी विष्णू गायकवाड हिची महाराष्ट्र मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपीनभाई कामदार, महासचिव डॉ ललित जीवानी, कोषाध्यक्ष एस एन मूर्ती, सहसचिव आणि स्पर्धा संयोजक श्याम देशमुख, एनएफआय स्पर्धा निरीक्षक विलास पराते, निवड समितीचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल, सभासद स्नेहदिप कोकाटे, जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव घुगरे, सचिव विठ्ठल महाले, परभणी जिल्हा सचिव कैलास माने, तिचे प्रशिक्षक महेशकुमार काळदाते, प्रशिक्षक मनोज टेकाळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उखळी येथील मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे, सरपंच पुंडलीकराव गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू गायकवाड, बाबासाहेब गायकवाड आदींनी तिचे अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.