टेनिस स्पर्धेत महेश परदेशी, यश गायकवाडला विजेतेपद

  • By admin
  • May 28, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरात नुकत्याच झालेल्या खुल्या गट दुहेरी लॉन टेनिस स्पर्धेत महेश परदेशी व यश गायकवाड यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. 

महेश परदेशी आणि यश गायकवाड यांनी महाराष्ट्राचा वेगवेगळ्या विभागातून आलेल्या खेळाडूंसमोर आपल्या तांत्रिक कौशल्याचे आकर्षक प्रदर्शन केले. छत्रपती संभाजीनगरच्या या जोडीने आपल्या प्रतिस्पर्धांना उसंत न मिळू देता सहज पराभूत केले व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या विजेतेपदाबद्दल पालकमंत्री संजय शिरसाट, विकास जैन, रेखा कुरिल, सरोज परदेशी, ज्वाला रगडे, छाया कालिके, गजेंद्र भोसले, शिखा श्रीवास्तव, हेमंत पातूरकर, डॉ शत्रूंजय कोटे आणि डॉ मकरंद जोशी यांनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *