
विराट कोहलीसह दिग्गज क्रिकेटपटू, उद्योजक, राजकीय मंडळी निमंत्रित
लखनौ ः भारतीय क्रिकेट संघातील धमाकेदार फलंदाज रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या मच्छलीशहर येथील तरुण खासदार प्रिया सरोज यांचा ८ जून रोजी लखनौ येथे साखरपुडा होणार होणार आहे. तर लग्न १८ नोव्हेंबर २०२५ रोजी वाराणसीतील हॉटेल ताज येथे होणार आहे.
साखरपुडा कार्यक्रमास क्रिकेट स्टार, चित्रपट कलाकार आणि उद्योगपतींना आमंत्रित केले आहे. तसेच उत्तर प्रदेशातील क्रिकेटपटू आणि केकेआरचे खेळाडू साखरपुड्याला उपस्थित राहणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, विराट कोहली, राहुल द्रविड, अभिषेक नायर यांच्यासह क्रिकेट स्टारनाही आमंत्रित करण्यात आले आहे. साखरपुड्याची तारीख निश्चित होताच रिंकू सिंगच्या कुटुंबाने खरेदी सुरू केली आहे.
साखरपुड्यात रिंकू सिंग स्टायलिश कोट-पँट घालणार आहे. सेंटर पॉइंट येथील एका प्रसिद्ध शिंपीने हे कपडे शिवले आहेत. वधूसाठी शगुन म्हणून एका मोठ्या शोरूममधून दागिने देखील खरेदी केले जात आहेत. साड्या देखील खरेदी करण्यात आल्या आहेत. साखरपुड्यापूर्वी शनिवारी आशीर्वाद घेण्यासाठी रिंकू सिंग कैंची धामला गेला आहे. त्याच्या कुटुंबात साखरपुडा आणि लग्नाची तयारी सुरू आहे.
वधूसाठी ३.५ कोटी रुपयांचे घर खरेदी केले
लग्नासाठी रिंकूने ओझोन सिटीमध्ये ३.५ कोटी रुपयांना घर खरेदी केले. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याचा गृहप्रवेश झाला होता, ज्यामध्ये खासदाराचे कुटुंब आले होते. नोव्हेंबरमध्ये खासदार प्रिया सरोज घर पाहण्यासाठी आल्या होत्या. खासदार प्रिया सरोज या महुआखेडा येथील मैदानावर गेल्या होत्या, जिथे रिंकू सिंग सराव करतो.
या घरात स्विमिंग पूल
प्रिया सरोजने घराच्या आतील भागात काही बदल केले होते. घरात सहा बेडरूम आहेत. या घरात स्विमिंग पूल देखील आहे. सपा खासदार प्रिया सरोज व्यवसायाने वकील आहेत. प्रिया आणि रिंकू एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. प्रियाचे वडील तुफानी सरोज यांनी सांगितले की प्रियाच्या मैत्रिणीचे वडील क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यामार्फतच रिंकू आणि प्रियाची ओळख झाली.
अलीगढमध्ये रिंकू सिंगचा जन्म
रिंकू सिंगचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी अलीगढमधील एका अतिशय साध्या कुटुंबात झाला. त्याचे वडील खानचंद्र गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर वाटप करायचे. सुरुवातीला त्याने स्वतः वडिलांना सिलेंडर वाटपाच्या कामात मदत केली आणि गरिबीशी झुंज देत क्रिकेटच्या मैदानावर आपले स्थान निर्माण केले.
२०२३ मध्ये उत्तम कामगिरी
सर्वप्रथम, डीपीएस मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय शालेय विश्वचषकात त्याने मालिकावीराचा किताब जिंकून प्रसिद्धी मिळवली. क्रिकेट तज्ज्ञांचे लक्ष त्याच्याकडे वळले तेव्हा त्याचा प्रवास सुरू झाला आणि तो आयपीएलपर्यंत पोहोचला. या काळात २०२३ मध्ये केकेआरकडून खेळताना त्याने केलेल्या शानदार कामगिरीनंतर तो देशात प्रसिद्ध झाला.
केकेआरने १३ कोटी रुपयांना कायम ठेवले
त्यानंतर रिंकू सिंग आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेट संघाचा सदस्य झाला आणि एकदिवसीय संघात स्थान मिळवले. आता त्याची मालमत्ता कोटींच्या घरात पोहोचली आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात केकेआरने त्याला १३ कोटी रुपयांना कायम ठेवले. रिंकू सिंगला २०१७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्यांदा १० लाख रुपयांना खरेदी केले होते. तथापि, त्याला त्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ८० लाख रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले.
वार्षिक उत्पन्न सुमारे ६० ते ८० लाख रुपये
आता त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६० ते ८० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. २०२४ मध्ये रिंकू सिंगची एकूण मालमत्ता सुमारे ८ कोटी रुपये असल्याचा अंदाज होता. ज्यामध्ये गेल्या वर्षी चांगली वाढ झाली आहे.