
नागपूर ः नागपूर शहरातील टाइगर सिटी साइक्लिंग असोसिएशनने नागपूर -पांढुर्णा-नागपूर अशी २०० किमीची “बीट द हीट नाईट राइड” आयोजित केली होती. त्यात २० राइडर्सनी सहभाग नोंदवला.
३१ मे रोजी प्रतापनगर चौक येथून सायंकाळी ५ वाजता याची सुरुवात झाली. १ जून रोजी सकाळी ६ वाजता ही राइड पूर्ण झाली. २०० किमीची राइड पूर्ण करणाऱ्या सायकल स्वारांमध्ये उदय पानवलकर, दिलीप वरकड, प्रदीप देशपांडे, दिलीप बिरे, किशोर कुमार चौहान, रोशन पाटील, सिद्धिविनायक जोगळेकर, कैलास यादव, अविनाश भांदक्कर, सचिन मेंढे, राजेश सोनवने, अभिजीत जोशी, वेदांत बांगडकर, जयप्रकाश सिंग, रेणुका जरे आणि अश्मित ढाकूलकर यांचा सहभाग होता. या सर्व राइडच्या दरम्यान सुरुवात व शेवटच्या स्थानकाचे व्यवस्थापन शेखर बालेकर, विनोद चेटुले यांनी केले. संकल्पना पूर्णत्वास आणण्यास जयंत मेंढीं, शुभम नारखेडे, शैलेश भिलावे, धर्मपाल फुलझेले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.